Shri Swami Samarth Aadhyatmik Sanshodhan Sanstha
// Shri Swami Samarth Jay Jay Swami Samarth //                    // Shri Swami Samarth Jay Jay Swami Samarth //                    // Shri Swami Samarth Jay Jay Swami Samarth //                    // Shri Swami Samarth Jay Jay Swami Samarth //                    // Shri Swami Samarth Jay Jay Swami Samarth //
 
प.पू. सद्गुरू
श्री. लाठकर काका
(संस्थापक व अध्यक्ष )
पूर्ण नाव           : श्री शरद बळवंतराव लाठकर
जन्म दिनांक      : ०८-११-१९४९
शैक्षणिक पात्रता :
B.Sc., B.Sc.(Tech) UDCT, मुंबई (१९७४)
 
English
     औरंगाबाद येथे ‘श्रीस्वामी निवास' या वास्तुमध्ये वास्तव्यास असलेले स्वामीस्वरूप प.पू. सद्गुरू श्री. शरद बळवंतराव लाठकरजी उपाख्य लाठकर काका यांच्या माध्यमातून प्रकट होत असलेल्या दिव्य प्रबोधनांचा लाभ आज अनेक स्वामीभक्त घेत आहेत. भक्ती-ज्ञान व उपासना या मार्गांचा अवलंब करीत या मानवी देहाचे कल्याण कसे साधावे याविषयीचे सांगोपांग मार्गदर्शन या प्रबोधनांद्वारे होत आहे. सन्मार्गावर चालण्याचा प्रयत्न करणार्‍या भक्तांच्या विविध समस्यांचे निराकरण करून उपासनेद्वारे मार्ग मिळत आहे.
     श्री. लाठकर काका  हे  विज्ञान  तंत्रज्ञान  क्षेत्रातील  पदवीधर  असून  त्यांनी  बरीच  वर्षे औद्योगिक क्षेत्रात उत्पादन व संशोधनाचे कार्य केलेले आहे.
     लहानपणापासुनच ज्ञान व भक्तीची गोडी असल्याने साधक अवस्थेतील अति उच्च कोटीचे अनुभव त्यांना येत होते. ब्रह्मांडाच्या अणुरेणूंमध्ये प्रत्येक जिवामध्ये परब्रह्म परमेश्वर कशा प्रकारे वसती करून आहे याची प्रत्यक्ष प्रचीती त्यांना मिळाली व अंतरंगातून ज्ञान व भक्तीचा झरा वाहू लागला. पुढे श्रीनृसिंहसरस्वती महाराजांच्या कृपेकरून अक्कलकोट येथे जाणे झाले व श्री स्वामी समर्थ महाराजांचे कृपाछत्र प्राप्त झाले. ‘सहज साधना' मार्गाचा अवलंब होत राहीला. यामधून दिव्य ज्ञानाचे स्फुरण होऊन वाणीद्वारे ते प्रकट होऊ लागले. ब्राह्ममुहूर्तावर ज्ञानरसपूर्ण वाणी प्रकट होत गेली पण या घटना म्हणजे पुढे होणार्‍या घटनांची एक चुणूक होती. प्रस्तुत कार्य १९ ऑक्टोबर २००५ पासून अव्याहतपणे चालू झाले. दररोज नित्यनेमाने संध्याकाळी साडे सहा वाजता ध्यानाच्या अत्युच्च अवस्थेत असतांना मुखावाटे ज्ञानपूर्ण, भक्तीपूर्ण, अशी ज्ञानगंगा स्त्रवू लागली. या वाणीस परतत्त्वाचा स्पर्श आहे. समाजातील प्रमाद, स्वैराचार, अधर्म यांची मीमांसा करीत समाजपुरुषाच्या उत्थानासाठी मानवाच्या परमकल्याणासाठी ही प्रबोधने प्रकट झाली व आजही चालू आहेत. ही प्रबोधने मानवनिर्मित नसून सद्गुरुतत्त्वाशी एकरूप झालेल्या मानवी देहाच्या माध्यमातून प्रकट होत असल्याने या प्रबोधनांना `संचार प्रबोधने' असे संबोधन प्राप्त झाले. त्याची यथार्थता स्वामीभक्तांना सश्रद्ध स्थितीत निश्चितपणे पटेल व प्रचीतीस येईल. एखादा भक्त जेव्हा ज्ञान भक्तीची परमोच्च अवस्था गाठतो तेव्हा तो निरहंकारी स्थितीत जातो. त्याचे मीपण उरत नाही. भक्त व सद्गुरू अभिन्न होतात.
     या  स्थितीतून  प्रकट  होत  असलेली  ही  संचार  प्रबोधने  वैशिष्ट्यपूर्ण  आहेत.  या प्रबोधनांमधून जवळपास ९० विषय प्रकट झालेले आहेत. ज्यामध्ये आत्मज्ञान, वेदांत रहस्य, उपनिषदे यावर यथार्थ प्रकाश टाकला आहे. याशिवाय साधकांना मार्गदर्शन करणारे व समाजाला दिशा देणारे अनेक विषय या प्रबोधनांमधून ऐकायला मिळतात. उपरोक्त वर्णन केलेली प्रबोधने ही हिंदी भाषेतून प्रकट होत आहेत हे एक वैशिष्ट्य नमूद करण्यासारखे आहे. यातील काही विषयांच्या ऑडीयो
DVD उपलब्ध आहे. संपर्क करावा.
     समस्त स्वामीभक्तांनी या प्रबोधनांचे श्रवण, मनन, चिंतन व आचरण करून आपले ऐहिक व पारलौकिक जीवन संपन्न व आनंदी करावे व गंधर्वदुर्लभ, देवदुर्लभ अशा मानवजन्माचे कल्याण करून घ्यावे ही स्वामी समर्थ सद्गुरूंची इच्छा आहे, आज्ञा आहे असे जाणून तद्नुसार  हा जीवनपथ आचरावा असा बोध सर्वांना प्राप्त होवो हीच सद्गुरुचरणी विनम्र प्रार्थना.
     विशेष म्हणजे २६ जानेवारी २०१२ पासून स्वामी विश्व प्रकल्प राबवायचा साधनेत आदेश झाला ज्याचा मुख्य उद्देश म्हणजे जगातील सर्व भागातील व सर्व स्तरावरील (मठ, मंदिरे, साधना केन्द्रे ई.) स्वामीभक्तांना एका व्यासपीठावर एकत्र आणून मनुष्य संस्कृती उत्थानाचे कार्य करणे, जी आता रसातळाला गेली आहे; याची सुरुवात व्यक्तिगतरीत्या स्वामीचा सिद्ध मंत्र 'श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ' या नामजप साधनेने करून नंतर ग्रुपमध्ये या कार्याचा विस्तार करावा, जेणेकरून नामजपाच्या माध्यमाने मनुष्य संस्कृती उत्थानाचे कार्य जगभर पसरेल. सर्व भक्तांना नम्र विनंती आहे की मनुष्य संस्कृती उत्थानाच्या कार्यात सहभागी होऊन आपणही आपला खारीचा वाटा या नामजप साधनेत नोंदवावा.
शुभं भवतु!
WARNING :
All are warned that the COPYRIGHTS of all the matter (Audio, Video, Photo or any other Information) on this Website belongs to P.Pu. Sadguru Shri Sharad B. Lathkar. COPY or DOWNLOADING of any matter from this website and reproducing it on any types of Social media and/or in any types of Book is strictly prohibited.